मुंबईत म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांनी गमावले डोळे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांनी गमावले डोळे

मुंबई  : मुंबईत म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांना डोळे गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, एका मुलीला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळे गमावलेले तिन्ही मुले 4, 6 आणि 14 वर्षे वयोगटातील आहे.

4 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये डायबेटिसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, 14 वर्षावरील मुलाला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. 4 आणि 6 वर्षाच्या या दोन मुलांवर इतर खासगी रुग्णालयात उपचार झाले. रुग्णालयाच्या मते, या दोन्ही मुलांचे डोळे काढले नसते तर त्यांचा जीव वाचवणे कठिण होते.  दरम्यान, मुंबईसह देशभरात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) जीवघेणा आजार ठरत आहे. कोरोना विषाणूमुळे होणारा हा बुरशीजन्य संसर्ग आहे. या आजाराची शेकडो लोकांना लागण होत आहे. त्यामुळे काहींना डोळे तर काहींना नाक गमवावे लागले आहे.