आज पुन्हा झाली पेट्रोल दरवाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आज पुन्हा झाली पेट्रोल दरवाढ

मुंबई  : सतत होणाऱ्या पेट्रोल दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (शनिवार) पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटरला विकल्या जात आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर येथे पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विकले जात आहे.

मे महिन्यात आतापर्यंत १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. परंतु कपात एकदाही झालेली नाही. एप्रिलमध्ये अधून-मधून कपात केली गेली. ज्यामुळे पेट्रोल ७७ पैसे आणि डिझेल ७४ पैसे स्वस्त झाले. पण मेनंतर पुन्हा किंमती वाढण्यास सुरवात झाली आणि मे महिन्यात पेट्रोल .५९ रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर या महिन्यात डिझेलमध्ये प्रतिलिटर .१३ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.