मुंबई : मलेरिया, डेंग्यूच्या नियंत्रणासाठी रुग्ण निदान, उपचार अधिक गतीने करा - महापौर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई : मलेरिया, डेंग्यूच्या नियंत्रणासाठी रुग्ण निदान, उपचार अधिक गतीने करा - महापौर

मुंबईमलेरिया डेंग्यूची सद्यस्थिती नियंत्रणात असली तरी आगामी सणासुदीच्या काळात प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून धूर फवारणी तसेच रुग्ण निदान उपचार अधिक गतीने करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

मलेरिया डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेतली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. काही ठिकाणी धूर फवारणीसाठी डिझेलचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे निर्दशनास आले असून याबाबत संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिले. आपण सर्वजण डेंग्यू, मलेरियाची रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.
काही विभाग कार्यालयांनी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी ड्रोन घेतले असून त्याचा अधिक वापर करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. त्यासोबतच डास उत्पत्ती करणारी ठिकाणे बांधकामाची ठिकाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. त्यासोबतच गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिक्षण जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. त्यासोबतच दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करून मुंबईकरांना अधिक सुरक्षित कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.  प्रारंभी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मलेरिया डेंग्यूची सध्यस्थिती विषद केली.