बाल कामगारांबाबत चाईल्ड लाईनला माहिती द्यावी- स्मृती ईराणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बाल कामगारांबाबत चाईल्ड लाईनला माहिती द्यावी- स्मृती ईराणी

नवी दिल्ली,  : बाल कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची घटना आढळल्यास नागरिकांनी PENCIL या संकेतस्थळावर किंवा 1098 या चाईल्ड लाईनला फोन करून त्याबाबतची माहिती द्यावी असे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे.

ट्विटर द्वारे स्मृती इराणी म्हणाल्या, “ शिक्षण आणि आनंदी बालपण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. बालकामगारीशी लढा देण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत. लोकांच्या मौल्यवान सहकार्यांनेच आपण  बालकांना त्यांच्या हक्काचे बालपण मिळवून देवू. बालकामगारीच्या घटना आढळल्यास नागरीकांनी https://pencil.gov.in/ या  संकेतस्थळावर अथवा चाईल्डलाईन-1098 ला फोन करून कळवावे. आपण बालकांचे देणे लागतो- कारण, ती आपल्या देशाचे भविष्य आहेत. "

हिंदुस्थान समाचार