गाथा नवनाथांची' मालिकेच्या शीर्षगीताला कैलाश खेर यांचा आवाज,

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गाथा नवनाथांची' मालिकेच्या शीर्षगीताला कैलाश खेर यांचा आवाज,

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. 'गाथा नवनाथांची' हे या मालिकेचे नाव असून येत्या 21 जूनपासून, सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडे सहा वाजता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'गाथा नवनाथांची' आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.