बलात्कार प्रकरणी अटक झालेला पर्ल व्ही. पुरीची एकता कपूरनं घेतली बाजू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बलात्कार प्रकरणी अटक झालेला पर्ल व्ही. पुरीची एकता कपूरनं घेतली बाजू

'नागिन ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पर्ल व्ही. पुरीवर बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर निर्माती एकता कपूर हिनं संताप व्यक्त करत पर्लची बाजू घेतली आहे.

पर्ल हा एकताच्या 'नागिन' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. तिनं पर्लची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणाली, 'मुलींची छेडछाड करणाऱ्या किंवा त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या कलाकाराला माझ्या मालिकांमध्ये स्थान मिळत नाही. पण पर्ल मात्र निर्दोष आहे. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहे. माझं कालंच त्या तरुणीच्या आईशी बोलणं झालंतिनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं की, मुलीचे वडिल अभिनेत्यावर खोटे आरोप करत आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून त्यांनी एक बनावटी कथा रचली आहे.'

एकताने पर्ल आणि त्या तरुणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे तरुणीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील एकताकडे आहे. अन् पुरावा म्हणून ती पोलिसांना देऊ शकते असा दावा तिनं केला आहे.