मध्यप्रदेश : बस-कंटेनर अपघातात 7 जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मध्यप्रदेश : बस-कंटेनर अपघातात 7 जणांचा मृत्यू

ग्वाल्हेंर,: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी सकाळी ट्रक आणि बस यांच्यात समोरोसमोर टक्कर होऊन भीषण अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या दुर्दैवी घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिंड जिल्ह्यातील गोहद चौक ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या डॉग बिरखडी येथे महामार्गावर शुक्रवारी ही अपघाताची घटना घडली. ट्रक आणि बस यांच्यात समोरा-समोर टक्कर होऊन हा अपघात घडला. अपघातानंतर प्रवाशांचा आरडा-ओरडा आणि मदतीची याचना ऐकून स्थानिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्त बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या जखमींना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचेही एसपी मनोज सिंग यांनी सांगितले.