भारतात 24 तासात 60,471 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  60,471 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  60,471 नवे कोरोना रुग्ण आढळले असून  2726 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  1,17,525  नागरिक बरे झाले आहेत.  भारतात कोरोनाचे   2,95,70,881 रुग्ण झाले असून एकूण 2,82,80,472 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 9,13,378 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,77,031 आहे.

आतापर्यंत देशात 25,90,44,072 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 17,51,358 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  38,13,75,984 चाचण्या घेण्यात आल्या.