टोकियो पॅरालिम्पिक: नेमबाजीत मनीषने सुवर्ण, सिंहराजाने रौप्यपदक जिंकले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोकियो पॅरालिम्पिक: नेमबाजीत मनीषने सुवर्ण, सिंहराजाने रौप्यपदक जिंकले

नवी दिल्ली,  : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेमबाजीमध्ये आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या 19 वर्षीय मनीष नरवाल याने सुवर्ण पदक तर, 39 वर्षीय सिंहराज अधाना याने रौप्य पदक जिंकले आहे.
मनीषने पी 4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल एसएस -1 फायनलमध्ये 218.2 गुणांसह प्रथम स्थान मिळवले. तर, सिंहराज (216.7) दुसऱ्या स्थानावर आहे. मनीषने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या आधी अवनी लाखेरा (महिला 10 मीटर एअर रायफल SH1) आणि सुमित अँटिल (पुरुष भाला फेक F64) यांनी सुवर्णपदके जिंकली. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 15 पदकाची लयलूट केली असून यात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मनीष आणि सिंहराज यांचे अभिनंदन केले आहे.