“मला आणि इतरांना संजय राऊतच…,” मुख्यमंत्र्यांसमोर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“मला आणि इतरांना संजय राऊतच…,” मुख्यमंत्र्यांसमोर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आभार मानले. तसेच उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनापासून धन्यवाद मानले. सध्या प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी चौकशीची टांगती तलवार आहे. तसेच शिवसेनेचे आणखी नेतेही ईडीच्या रडारवर आहेत.

“मुख्यमंत्री साहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आजपासून या प्लँटचे लोकार्पण झाल्यामुळे कार्यरत होत आहे. या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. खासकरून संजय राऊत साहेब यांचे मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत.”, असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.