प्रविण दरेकर यांनी घेतला माणगावमधील पूरपरिस्थितीचा आढावा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रविण दरेकर यांनी घेतला माणगावमधील पूरपरिस्थितीचा आढावा

मुंबई : माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत. भर पावसात अतिशय खडतर प्रवास करीत विरोधी पक्ष नेते दरेकर माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहोलचले आहेत. परंतु पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फुट पाणी असल्यामुळे पुढील मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत रेस्क्यु टीमही उपस्थित आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करुन येथील पूरपरिस्थीतीची बचाव कार्याची माहीती घेतली.

दरेकर यांनी सांगितले की, बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळ पर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करतील. आम्ही सुध्दा एनडीआरएफ टीम सोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण महाड रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे माणगाव, महाड येथील नागरिक घाबरले असून अनेक नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमधील तळा येथील गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर दुस-या बाजूला जलमय झालेल्या परिस्थितीत येतील नागरिक अडकले आहेत. पण या संकटाच्या स्थितीत आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.