टी-२० वर्ल्डकपबाबत जय शाह म्हणतात, ‘‘आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टी-२० वर्ल्डकपबाबत जय शाह म्हणतात, ‘‘आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत”

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ यंदा भारतात होणार होता, पण ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्पर्धा यूएई आणि ओमानला हलवण्यात आली आहे. या वृत्तानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एएनआयशी बोलताना यंदाच्या टी-२० वर्ल्डकपबाबत मोठे अपडेट दिले आहे.

जय शाह म्हणाले, ”आम्ही भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपला यूएईमध्ये हलवू शकतो. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही लवकरच अंतिम निर्णय घेऊ.”  ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील. करोनामुळे आयपीएलची उर्वरित स्पर्धाही यूएईत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

ईएसपीएनच्या अहवालानुसार टी-२० वर्ल्डकप दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये संघ भिडणार आहेत. पैकी संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.