सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते दोन वर्षांसाठी या पदावर कार्यरत असतील. केंद्र सरकारने मंगळवारी रात्री या संदर्भात पत्रक जारी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली होती. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती

 

ही नावेही होती स्पर्धेत

 

सीबीआय संचालक पद फेब्रुवारीपासून रिक्त होते. ऋषी कुमार शुक्ल हे फेब्रुवारीपर्यंत संचालक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा फेब्रुवारीपासून सीबीआयचे अंतरिम प्रमुख होते. संचालकपदाच्या शर्यतीत सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासोबतच आणखी तीन अधिकारीही स्पर्धेत होते. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावे चर्चेत होती.

 

प्रशासकीय कारकीर्द

 

  • सुबोध कुमार जयस्वाल १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
  • भारतीय गुप्तचर यंत्रणा (रॉ) मध्ये नऊ वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
  • तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपासात महत्वाची जबाबदारी
  • २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभाग
  • मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त
  • जुलै २०१८ मध्ये मुंबई पोलीस आयुक्त
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपद भूषवले