फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य – सुधीर मुनगंटीवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य – सुधीर मुनगंटीवार

राज्यात करोना, मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी अशा मुद्यांवरून अगोदरच भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात असताना, आता यामध्ये आणखी एका जुन्याच मुद्द्याची नव्याने भर पडल्याचे दिसत आहे. तो म्हणजे विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा. कारण, यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती. यावरून आता पुन्हा एकदा भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवरून टिप्पणी केली आहे.  “दोन दिवसांचं अधिवेशन होतं. कधी सुरू होतं आणि कधी संपतं, असं स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे. कारण कोरना विषाणूने सांगितलेलं आहे, की आमचा हल्ला मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर. या दोनच मंदिरांवर आम्ही हल्ला करणार आहोत. त्यामुळे आम्ही मंदिरं बंद ठेवतो आणि अधिवेशनाचं लोकशाहीचं मंदिर बंद ठेवतो. बाकी आम्ही सगळं सुरू ठेवतो कारण, करोना विषाणू सांगतो की आम्ही बिअर बारमध्ये हल्ला करणार नाही. नवीन काही आमच्याकडे संशोधक आले आहेत. तर, आता राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे. विधान परिषदेवरील नियुक्त्या लवकर कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली असता, या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावरून राज्यपाल विधान परिषदेवरील नियुक्त्या लगेचच करणार नाहीत हेच सूचित होते.