निर्मला सीतारमण यांनी घेतली महत्वाची आढावा बैठक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्मला सीतारमण यांनी घेतली महत्वाची आढावा बैठक

दिल्ली: जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  केंद्रीय  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी  पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची डिजिटल माध्यमाने बैठक घेतली. पायाभूत सुविधा पथदर्शी आराखड्याबाबत मंत्रालये/विभाग यांच्याबरोबरची अर्थमंत्र्यांची ही सहावी आढावा बैठक होती. मंत्रालये आणि त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भांडवली खर्चाबाबत  निर्मला सीतारमण यांनी आढावा घेतला. महामारी नंतर अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी संबंधितांचा वाढीव भांडवली खर्च महत्वाची भूमिका वठवेल यावर त्यांनी भर दिला. मंत्रालयांनी आपल्या भांडवली खर्चाचा भार वाढवावा असं सांगतानाच याबाबतचे लक्ष्य साध्य करावे असेही सीतारमण यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पासाठी  5.54 लाख कोटी रुपये भांडवल उपलब्ध केले आहे, 2020-21 च्या तुलनेत तब्बल 34.5 टक्के वाढ नोंदली गेली आहे असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनीही भांडवली खर्च वाढवण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे असेही सीतारमण म्हणाल्या.