प्रदर्शनाच्या तारखेआधीच रिलीज झाला ‘मीमी’ सिनेमा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रदर्शनाच्या तारखेआधीच रिलीज झाला ‘मीमी’ सिनेमा

आज अभिनेत्री क्रिती सेनॉनचा वाढदिवस आहे. गेल्या काही दिवसांपासूनच क्रितीच्यामीमीया सिनेमाची चांगलीच चर्चा रंगतेय. मात्र हा सिनेमा आता जाहीर केलेल्या तारखेआधीच रिलीज करण्यात आला आहे. पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेला मीमी सिनेमा ३० जुलैला नेटफ्लिक्स आणि जीओ सिनेमावर रिलीज होणार होता. मात्र एका घटनेमुळे हा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेआधीच रिलीज करण्यात आला आहे.

या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. सोमवारी संध्याकाळी वाजून १५ मिनिटांनी अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि पंकज त्रिपाठी यांनी सिनेमाच्या टीमसोबत इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन केलं. यावेळीच सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली. हा सिनेमा टेलिग्रामवर लीक झाल्याची माहिती सिनेमाच्या टीमच्या हाती लागल्याने सिनेमा आधीच रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. सिनेमा लीक झाल्याचं कळताच संपूर्ण टीमने महत्वाचा निर्णय घेत सिनेमा सोमवारी रिलीज करत क्रिती सेनॉनला देखील खास सरप्राईज दिलं आहे. क्रिती सेनॉनने सिनेमाच्या टीमसोबत सोमवारी संध्याकाळी एक लाइव्ह सेशन केलं. खरं तर क्रिती सेनॉन प्रॉडक्शन हाउसच्या ऑफिसमध्ये गेली होती. इथं एक दिवस आधीच तिच्यासाठी बर्थ डे पार्टी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान लाइव्ह सेशनवेळी  क्रिताला आणखी एक खास सरप्राइज मिळालं आहे. सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता हा सिनेमा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.