निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे. जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले, “ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सुचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल.”

महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले.

टप्प्याटप्प्याने आपण निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवाणगी नसायची. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत आहोत. कदाचीत रेल्वेजवळ तेवढं मनुष्यबळ नसेल. तसेच येवढ्या गर्दीत प्रवाशांची तपासनी होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, अशी आशा असल्याचे राजेश टोपे म्हणाले.