काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

मुंबई : अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. ठाकूर हे मागील -याच वर्षांपासून आजारी होते. अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे आमदार होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते.