राज्यात पुढील तीन-चार दिवस पावसाचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यात पुढील तीन-चार दिवस पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात ते सप्टेंबर या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यात अनेक भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  यात आज बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रविवार आणि सोमवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये सप्टेंबरला पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाडा, तसेच सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यात मान्सून पुन्हा जोर घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.