पर्यावरण संवर्धन : सौर ऊर्जा आणि ऊर्जा बचत करणारे एलईडी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पर्यावरण संवर्धन : सौर ऊर्जा आणि ऊर्जा बचत करणारे एलईडी

मुंबई : पर्यावरणाच्या सुधारणेत रेल्वे योगदान देण्यास कटिबद्ध आहे. या दिशेने अक्षय ऊर्जेचा उपयोग करण्यासारख्या पर्यावरणास अनुकूल अशा उपायांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे ज्यात पवन आणि सौर ऊर्जा यांचा समावेश आहे. रेल्वेने १००० हून अधिक स्थानके आणि ४०० सेवा इमारतींमध्ये सुमारे ११४ मेगावॅट सौर रूफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत "निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक" होण्याची योजना आहे सन २०२०- २१ दरम्यान सर्व रेल्वे स्थानकांमध्ये (,००० पेक्षा अधिक) आणि सर्व रेल्वे प्रतिष्ठान इमारतीं (२०,००० पेक्षा अधिक) मधील प्रकाशयोजना १००% एलईडी रिप्लेसमेंट केली आहे. सर्व निवासी क्वार्टर मधील (सुमारे लाख क्वार्टर) प्रकाशयोजना देखील मे २०२० पर्यंत एलईडीमध्ये रूपांतरित झाली आहे

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह रेल्वे स्थानकासह रेल्वे स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) चे प्रमाणपत्र मिळाले आहे.