शहरात लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये घबराट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शहरात लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये घबराट

डोंबिवली,  : कल्याण डोंबिवली महानगर परिक्षेत्र कोरोना महामारीच्या ग्राफ अद्याप कमी होतांना दिसून येत नाही. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध माध्यमातून आरोग्यसेवा दिली जात आहे. कोरोना संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. यासाठी कोविशिल्ड आणि कोवक्सिन अशा दोन लसी येथील नागरिकांना देण्यात येत आहेत. परंतु सध्या शहरात कोवक्सिन लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवली शहरात सध्या ज्या लसीकेंद्रातून लसीकरण केले जात आहे त्यामध्ये पुण्यातील सिरम कंपनीच्या "कोविशिल्ड" लसच देण्यात येत आहे. डोंबिवली शहर तसेच ग्रामीण विभाग म्हणून सिमरे 34 केंद्रातून लसीकरण केले जाते. लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफलाईन अशा पद्धतीने होत असते. सदर लसीकरणासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी तसेच डॉक्टर-नर्स आणि प्रशासकीय कर्मचारी यांचे बहुमुल्य योगदान मिळत आहे.

सोमवार बुधवार अशा नियोजित दिवसात प्रत्येक लसीकरण केंद्रातून सुमारे 400-500 नागरिकांचे लसीकरण होत आहे. परंतु असे असले तरी सध्या एका मोट्या लसीकरण समस्येला येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून मार्च महिन्यात तिसऱ्या आठवड्यात कोवक्सिन लसीचे लसीकरण करण्यात आले होते. पहिला डोस (लस) कोवक्सिन नागरिकांनी घेतली. आता अशा पहिला डोस (लस) घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस (लस) घ्यायची आहे कारण पहिली लस घेऊन 45 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, पालिका परिक्षेत्रात कोणत्याही लसीकरण केंद्रात कोवक्सिन लस नसल्याने आत लस कशी, केव्हा, कुठे मिळेल अशी विचारणा होत आहे.

मुख्य म्हणजे या लसीच्या प्रतीक्षेत असणारे मोठया प्रमाणात जेष्ठ नागरिक असल्याने त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. याविषयी पालिकेच्या रुग्णालयात विचारणा केली असता आता कोवक्सिन लस नाही अशी त्रोटक उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमध्ये अधिक घबराट होत आहे. याबाबत पालिकेच्या कोविड विभागाचे प्रमुख डॉ. संदीप निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कोवक्सिन लस थोडे दिवस आली होती आम्ही त्या विषयी माहिती दिली होती. पण आता आपल्याकडे कोवक्सिन लस उपलब्ध नसून ती कधी येईल हे ही सांगता येत नाही