देशातील राज्यांना 26 कोटींपेक्षा अधिक लसी प्रदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशातील राज्यांना 26 कोटींपेक्षा अधिक लसी प्रदान

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आतापर्यंत केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जवळपास 26,60,80,900 लसीच्या मात्रा विनामूल्य आणि थेट खरेदी या दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून दिल्या आहेत.याव्यतिरिक्तवाया गेलेल्या लसीच्या मात्रांसह एकूण 23,11,69,251 इतक्या लसींच्या मात्रांचा वापर करण्यात आला आहे. (सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार) एकूण 1.49 कोटी (1,49,11,649) कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप उपलब्ध आहेत.24.60 कोटी पेक्षा अधिक लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आल्या.कोविड लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य लसींच्या मात्रा उपलब्ध करून देत सहकार्य करीत आहे. या व्यतिरिक्त राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लस उत्पादकांकडून थेट लसी खरेदी करता याव्यात यासाठी देखील केंद्र सरकार सुविधा पुरवित आहे.

कोविड-19 लसीकरणाच्या  व्यापक आणि गतिशील तिसऱ्या टप्याची  1 मे  पासून  अंमलबजावणी सुरु झाली आहे. या धोरणानुसार, कोणत्याही उत्पादकाद्वारे तयार करण्यात आलेल्या केंद्रिय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50  टक्के लसीच्या मात्रा भारत सरकारकडून घेतल्या जातील. पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारांना लसींंच्या या मात्रा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील.देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा  नूतन- तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु झालेला आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या 18-44 सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पात्र नागरिक लसीकरणासाठी http://Cowin.gov.in.  या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी करू शकतात.