गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते; मुख्यमंत्र्यांचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं होतं. अचानक उद्रेक झाल्यानं राज्यात दुसऱ्या लाटेच्या काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आता दुसरी लाटही हळूहळू ओसरू लागली आहे. असं असलं, तरी डेल्टा प्लस या नव्या करोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.

मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला. मग धारावीचा रस्ता झाला. जिथे मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे. एमएमआरडीएचं कार्यालयं झालं, तिथं त्याचा फायदा झाला म्हणून ट्राफिक जाम होणाऱ्या ठिकाणी एमएमआरडीएची कार्यालये सुरू करायची का?, असं मिश्कील भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. विस्तारत चाललेल्या मुंबईसाठी मार्ग काढले जात आहे, याबद्दल मी एमएमआरडीएचं मुंबईकरांच्या वतीने कौतुक करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.