1 जूनपासून तरी व्यापार सुरू करू द्या - पुणे व्यापारी महासंघ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

1 जूनपासून तरी व्यापार सुरू करू द्या - पुणे व्यापारी महासंघ

पुणे : सणांच्या काळात दुकाने बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहेत. गेले दीड
महिने व्यापारी पेठ बंद असून, 31 मेनंतर दुकाने खुली ठेवण्यास मुभा द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी
महासंघाने केली आहे.याबाबत महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर दि. 5 मेपासून
जीवनावश्‍यक वस्तुंची दुकानेवगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली. 
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईदच्या कालावधीत दुकाने बंद होती.यामुळे व्यापारी आणि पर्यायाने
कर्मचाऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. राज्यातील व्यापारक्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, असे
रांका आणि पितळिया यांनी सांगितले.गेले दीड महिने दुकाने बंद आहेत. या कालावधीत व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा
विचार केला. त्यांना वेतन दिले. परंतू, यापुढील काळात कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अशक्‍य होणार आहे. पर्यायाने
अनेकांवर बेराजगार व्हावे लागेल. व्यापारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत, असे निवेदनात
म्हटले आहे.