गणेशोत्सवात गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार - अजित पवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गणेशोत्सवात गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार - अजित पवार

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेऊन जर गर्दी होते असं लक्षात आल्यास दुसऱ्या दिवसापासून लागलीच कठोर निर्बंध लावण्यात येतील. पुण्यात कोरोना आढाव बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात ग्रामीण भागात कोरोना नसल्यासारखं नागरिक वागू लागले आहेत. त्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचंही पवार यावेळी म्हणाले आहेत. लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण अजून अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. राज्याकडून जास्तीत जास्त लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत.