तारक मेहता…’ मधील सोनूला करावा लागतो बॉडी शेमिंगचा सामना,

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तारक मेहता…’ मधील सोनूला करावा लागतो बॉडी शेमिंगचा सामना,

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपली एक ओळख निर्माण केली आहे. मालिकेतील सोनू ही भूमिका सगळ्यात आधी झील मेहताने साकारली होती. झीलचे लाखो चाहते आहेत. या मालिकेनंतर झीलला सगळे चाहते सोनू म्हणून ओळखू लागले होते. मात्र, झीलला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो, याविषयी आता झीलने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत झीलने बॉडी शेमिंगविषयी सांगितले आहे.

झीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत बॉडी शेमिंगविषयी सांगितले आहे. तिच्या शरीरावर कशा कमेंट केल्या जात होत्या त्या विषयी तिने या व्हिडीओत सांगितले आहे. या व्हिडीओत ‘तू खूप मेकअप करतेस, तू खूप उंच आहेस. तुझे दात मोठे आहेत, अशा अनेक गोष्टी बोलत लोक तिला बॉडी शेम करतात. मात्र, आता तिने स्वत: ला तसेच स्विकारले आहे, असे ती या व्हिडीओत सांगताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत ‘हे गाणं मी लहाण असताना ऐकायला पाहिजे होतं. स्वत: ला आहे तशी स्वीकारण्यास आणि हे समजून घेण्यास मला जास्त काही मेहनत घ्यावी लागली नसती. मला जाणवले की जो पर्यंत मी स्वत: ला स्वीकारले आहे तोपर्यंत कोणी काहीही बोलल तरी ते महत्वाचं नाही,’ अशा आशयाचे कॅप्शन झीलने दिले.