गोंदिया : विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने - उदय सामंत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गोंदिया : विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने - उदय सामंत

गोंदिया : कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र, आता हायकवार कमेटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून आता ती फाईल वित्त विभागाडे गेली आहे. तिला दोन-तीन दिवसात मंजूरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरूवात होईल तर तासीका प्राध्यापकाच्या मानधनात  वाढ करण्यात येणार असून विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नसून तर त्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गोंदियात पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार रीट पीटीसन दाखल करणार असून छत्रपती घराण्यातील संभाजी राजेंना  पंतप्रधानांनी वर्ष दीड वर्ष भेट देणं हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान असल्याची टिका उदय सामंत यांनी मोदींवर केली. तर जेईई आणि नीटच्या परीक्षा घेणे हे केंद्र सरकारच्या हातात असून ज्याप्रमाणे सीबीएसई दहावी बारावीच्या केंद्र सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत. जो केंद्राचा विभाग तो जेईई आणि नीटच्या तारखा जाहीर करेल. मात्र, प्रोफेशनल कौर्सेससाठी असलेली सीईटी शंभर टक्के जुलै महीन्यात घेणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.