अभिनेत्री एवलिन शर्मा होणार आई

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेत्री एवलिन शर्मा होणार आई

ये जवानी है दिवानीचित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने लग्नानंतर काही दिवसातच चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. एवलिन लवकरच आई होणार आहे. एवलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. १५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले. २०१९मध्ये एवलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता. एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांनी ही बातमी दिली होती.

त्यानंतर नुकत्याच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत एवलिनने ती आई होणार असल्याचा खुलासा केलाय. गरोदरपणाच्या या बातमीने एवलिन खूपच आनंदात आहे. १२ जुलैला एवलिनचा वाढदिवस असून ही बातमीच तिच्यासाठी मोठं गिफ्ट असल्याचं ती म्हणाली. तसचं एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केलाय.या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “तुला माझ्या कुशीत घेण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही.”

तसंच मुलाखतीत एवलिन म्हणाली, “मला तर चंद्रावर असल्यासारखं वाटतंय. याहून सुंदर बर्थडे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार. मी आशा करते की बाळाला घेऊन मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटू शकेन.” असं म्हणत एवलिनने ती ऑस्ट्रेलियामध्येच बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलं आहे.