तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडनं नोंदवला मोठा पराक्रम!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडनं नोंदवला मोठा पराक्रम!

न्यूझीलंडने आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा गडी राखून पराभव केला. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला दुसर्या डावात फक्त १७० धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने दोन गडी गमावत १३९ धावांचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या, तर न्यूझीलंडने २४९ धावा केल्या. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली कसोटी १८७७ मध्ये खेळली गेली.

२१ वर्षानंतर न्यूझीलंडला मिळाली आयसीसीची ट्रॉफी

तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीचे  विजेतेपद जिंकले आहे. २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले. टीम इंडियाने प्रथम खेळत बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने गडी आणि चेंडू राखून हे लक्ष्य गाठले. ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा केल्या होत्या.