यूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

यूरो कप २०२०: फ्रान्स, पोर्तुगाल आणि जर्मनीची बाद फेरीत धडक

यूरो कप २०२० स्पर्धेतील खडतर अशागटातील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. या गटातून कोणता संघ बाद फेरीत पोहोचेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने तीन संघ बाद फेरीत पोहोचले आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालची बाद फेरीत वर्णी लागली आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांना बाद फेरीत चांगल्या लढती पाहायला मिळणार आहेत.

गतविजेत्या पोर्तुगाल संघांला जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यासाठी पोर्तुगाल संघाने आपलं कसब पणाला लावलं होतं. पोर्तुगालने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. स्पर्धेच्या ३० व्या मिनिटाला पोर्तगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल झळकावत संघाला - ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दडपणात आलेल्या फ्रान्स संघाची बरोबरी साधण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. फ्रान्सने पहिल्या सत्रातील शेवटच्या क्षणाला गोल झळकावत बरोबरी साधली. फ्रान्सच्या करीम बेन्झेमा याने गोल मारत संघाला - अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी दुसऱ्या सत्रात आपलं कसब पणाला लावलं. दुसऱ्या सत्रातील ४७ व्या मिनिटाला फ्रान्सच्या करीम बेन्झेमाने आणखी गोल झळकावला आणि संघाला - अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आधीच जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या पोर्तुगाल संघाची चांगलीच दमछाक झाली. मात्र ६० मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल झळकावत संघाला बरोबरी साधून दिली. हा पेनल्टी गोल होता. त्यानंतर दोन्ही संघ विजयी गोल मारण्यासाठी धडपडत राहीले. मात्र दोन्ही संघांना अपयश आलं.