ठाकरे सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय  अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. ह्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झाली. याच पार्श्वभूमीवर, दिलासा देत आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, सर्व यंत्रणांनी ही मदत तात्काळ बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे स्पष्ट निर्देश देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला होता. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. याच अनुषंगाने आता राज्याच्या महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे. यात पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीमचं वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास विभागीय आयुक्तांमार्फत मंजुरी देण्यात आली असून तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.