महिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार- यशोमती ठाकूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार- यशोमती ठाकूर

नाशिक : महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून माहिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा कोरोना सद्यस्थितीचा व महिला बाल विकास विभागाचा आढावा घेताना मंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी सर्वश्री आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या सभापती अश्व‍िनी आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडेय्, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाचे सह संचालक दुष्यंत भामरे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी दिपक चाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच या भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्मॉल मार्टही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी, असे ड यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बालकांविषयीच्या समित्याविषयी अधिक जागृकपणे काम करणे आवश्यक असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समिती विषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच कोंटुबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, महिला आयोगाच्या कार्यालयाचे कामकाज, बालगृह वन स्टॉप सेंटर वर लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना यावेळी, ड यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना काळात बालकांना दत्तक घेणे व देणे याबाबत समाज माध्यमांवर विविध संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाचे अनधिकृतपणे दत्तक देवाण - घेवाण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच स्थलांतरीत महिला व बालकांना योग्य त्या सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही यावेळी महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांनी यावेळी बैठकित सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात जिल्हा परिषदेने राबविलेली एक मूठ पोषण आहारहा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे उपक्रमामुळे बालकांचे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत झाली असल्याचे, महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. बैठकित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागात महिला व बालकांसाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांची माहिती दिली असून तसेच अंगणवाडी व शाळा यांच्या बांधकामांच्या सद्यस्थितीची माहिती महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांना सादर केली आहे. दुसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन जनजागृती करावी: कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा सद्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याची तीव्रता अधिक आहे. त्याअनुषंगाने उपाययोजनांसोबतच दुसऱ्या लाटेचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याबाबत सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच पोस्ट कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देखील नियोजन करण्यात यावे, त्याप्रमाणेकोरोना काळात तृतीय पंथीयांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांनी केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. तसेच शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी कोरोना सद्यस्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.