टॉस जिंकल्यास भारताने काय निर्णय घ्यावा; सौरभ गांगुलीने दिला सल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टॉस जिंकल्यास भारताने काय निर्णय घ्यावा; सौरभ गांगुलीने दिला सल्ला

संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडणार असून जगज्जेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. दरम्यान इतक्या महत्वाच्या सामन्यात टॉस जिंकल्यास भारताने नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा यासंबंधी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने सल्ला दिला आहे. सौऱभने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. ढगाळ वातारवण असलं तरी भारताने प्रथम फंलदाजी करावी, कारण परदेश दौऱ्यात भारतीय संघासाठी हे फायद्याचं ठरलं आहे असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय संघ विजयी होऊन मायदेशी परतेल असा विश्वास सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे. मात्र गांगुलीने यावेळी न्यूझीलंड संघाला पराभूत करणं कडवं आव्हान असल्याचंही मान्य केलं आहे.

गांगुलीने सांगितलं आहे की, “जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलेत तर भारताने परदेशात चांगली कामगिरी केली आहे. आपण जेव्हा प्रथम फलंदाजी केली आहे तेव्हा सामने जिंकले आहेत. आता हा तुमच्या निवडीचा प्रश्न आहे की, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला प्रेशर घ्यायचं की चौथ्या डावापर्यंत थांबायचं”. “दक्षिण आफ्रिकेतील २००२ आणि २०१८ मध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आणि प्रेशर कमी करुन धावा उभ्या करत सामने जिंकले आहेत,” असंही गांगुलीने यावेळी सांगितलं. दरम्यान गांगुलीने भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.