क्रिकेटपटू वृद्धिमान साहाला पुन्हा झाला करोना!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

क्रिकेटपटू वृद्धिमान साहाला पुन्हा झाला करोना!

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आयपीएल २०२१ दरम्यान साहाला करोनाची लागण झाली. सुमारे दोन आठवडे क्वारंटाइन राहिल्यानंतरही त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, वृद्धिमान साहामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यापूर्वी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला, की तो जवळजवळ बरा झाला आहे. मात्र, आता पुन्हा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला आता दिल्लीत क्वारंटाइन राहावे लागेल. आता त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. या चाचणीत निगेटिव्ह आढळल्यास डॉक्टर त्यांना क्वारंटाइनमधून मुक्त करू शकतात.

 ‘‘करोना झाल्यानंतर मी घाबरलो होतो. पृथ्वीवर थांबलेल्या विषाणूची लागण झाल्यानंतर, मला भीती वाटली. कुटुंबातील प्रत्येकजण खूप काळजीत होता. आम्ही त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे धीर दिला, की घाबण्याचे कारण नाही. माझी पुरेशी काळजी घेतली जात आहे”, असे साहाने सांगितले होते. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वीस सदस्यांमध्ये संघात वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात आला आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो संघासह जाऊ शकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.