कोविशिल्ड लस घेतलेले युरोपमध्ये प्रवास करू शकतील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोविशिल्ड लस घेतलेले युरोपमध्ये प्रवास करू शकतील

नवी दिल्ली: कोविशिल्ड लस घेतलेले नागरिक युरोपमधील देशांचा प्रवास करू शकतील. युरोपियन युनियनचा भाग असलेल्या जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड आणि स्पेन या सात देशांनी तसेच स्वित्झर्लंड या देशाने कोविशिल्ड लसला मान्यता दिली. यामुळे कोविशिल्ड लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, व्हिसा, पासपोर्ट आदी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रवास करू शकतील. EU Green Pass Row: Seven European Unions and Switzerland clear Covishield vaccine for entry

याआधी युरोपिनय युनियनने भारतात कोविशिल्ड लसचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली नव्हती. यामुळे भारतातून युरोपमध्ये जाणे कठीण झाले होते. भारतीय नागरिक असलेल्या पण शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय या निमित्ताने युरोपमधील देशात राहणाऱ्या आणि सध्या मायदेशात असलेल्या नागरिकांची पंचाईत झाली होती. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे.

भारतीय लस प्रमाणपत्राला ग्राह्य धरले नाही तर युरोपियन युनियनच्या लस घेतल्याच्या प्रमाणापत्राला भारत स्वीकारणार नाही, असा पवित्रा भारताने घेतला. यानंतर भानावर आलेल्या युरोपियन युनियनमधील सात देशांनी भारताच्या कोविशिल्ड लसच्या प्रमाणपत्राला ग्राह्य धरणार असल्याचे जाहीर केले. लवकरच कोवॅक्सिन लसच्या प्रमाणपत्रालाही युरोपियन युनियनमधील देशांकडून ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे.

कोविशिल्ड ही लस अॅस्ट्राझेंका, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची एक प्रयोगशाळा आणि पुण्याची सीरम इन्स्टिट्युट या तीन संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून विकसित झाली आहे. लस विकसित करण्यासाठी युरोपमध्ये तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर प्रयोग आणि चाचण्या करण्यात आल्या. यामुळे युरोपियन युनियनमधील सात देशांनी भारताच्या कोविशिल्ड लसच्या प्रमाणपत्राला ग्राह्य धरणार असल्याचे जाहीर केले.

नव्या व्यवस्थेनुसार कोविशिल्ड लसचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला योग्य कागदपत्रांसह प्रवास करत असल्यास जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रवास करता येईल. लसचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणाऱ्याला संबंधित देशांमध्ये भारतातून आल्यास क्वारंटाइन राहण्याची गरज नसेल. यामुळे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय या निमित्ताने भारतातून जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन, स्वित्झर्लंड यापैकी कोणत्याही देशात जाणाऱ्याला क्वारंटाइन राहावे लागणार नाही. संबंधित देशात उतरताच प्रमाणपत्र, व्हिसा आणि पासपोर्ट सोबत बाळगणाऱ्या व्यक्तीला आरामात त्यांची कामं करता येतील.