दिनेश कार्तिक गाजवतोय कॉमेंट्रीचं मैदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिनेश कार्तिक गाजवतोय कॉमेंट्रीचं मैदान

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने नुकतेच समालोचक म्हणून पदार्पण केले. बॅट आणि बॉल सोडून माइक धरलेल्या कार्तिकला लोकांनी मोठ्या सहजतेने या नवीन भूमिकेत स्वीकारले. परिणामी, तो स्काय स्पोर्ट्सच्या वतीने कमी कालावधीत २०२१मध्ये यूकेचा सर्वात लोकप्रिय समालोचक बनला आहे.

दिनेश कार्तिकबद्दलचा हा खुलासा सोशल मीडिया विश्लेषणाच्या निकालांवर आधारित एका ऑनलाइन बेटिंग साइटने केला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) खेळताना दिसणार असला, तरी यासाठी त्याला समालोचन सोडावे लागेल आणि यूएई गाठावे लागेल.

समालोचक म्हणून कार्तिकची भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यापासून सुरू झाली. भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, तो व्हायटॅलिटी ब्लास्ट आणि द हंड्रेडमध्ये समालोचन करतानाही दिसला. नवीन भूमिकेत प्रेक्षकांमध्ये कार्तिक सुपरहिट ठरला. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल एथरटन, यांना त्याला त्याच्या फॅशनेबल शैलीसाठी प्रसारणाचे जॉर्जियो अरमानी असे म्हटले.

कार्तिक अजूनही क्रिकेट खेळत आहे आणि तो टीम इंडियासाठी खेळत असलेल्या खेळाडूंशी सहज संपर्क साधत होता. यामुळे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंसह बड्या भारतीय खेळाडूंच्या अनेक उत्कृष्ट मुलाखती होऊ शकल्या.