अमिताभ बच्चनच्या 'चेहरे' सिनेमात दिसणार रिया चक्रवर्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमिताभ बच्चनच्या 'चेहरे' सिनेमात दिसणार रिया चक्रवर्ती

सुशांत सिंग राजपुतने आत्महत्या केली आणि त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड असलेली रिया चक्रवर्ती इंटरनेट स्टार झाली. बऱ्याच घटना घडत गेल्या. मीडियाने आपआपल्या कहाण्या बनवल्या. काहींना रियाला सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरले तर काहींनी तिच्या बाजूने तिची बाजू मांडली. तर काहींनी न्यूट्रल भूमिका घेतली. कोणत्या वृत्तपत्राने कोणती भूमिका घेतली हे जरी आत्ता महत्वाचे नसले तरी प्रत्येकाने ह्या गोष्टी संदर्भात बातम्या छापून बक्कळ पैसे मात्र कमावले. असो.

रियाच्या करियरचे पुढे काय? तिची ढासळलेली प्रतिमा पीआर टीम कशी उभारणार? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले असतील. पण तुम्हाला माहितेय का? रियाचा सिनेमा येतोयआणि ते ही चक्क लिजेंड अमिताभ बच्चन यांच्या सोबत. ह्या सिनेमाचं नाव आहे 'चेहरे'. अमिताभ बच्चन यांच्यासह या सिनेमामध्ये इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसुजा, कृती खारबांडा, सिद्धार्थ कपूर, अन्नू कपूर, धृतिमान चटर्जी असे कलाकार दिसणार आहेत.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज झाला होता. ज्यामध्ये काही सेकंदापुरताच रिया चक्रवर्ती दिसली होती. रियाला या सिनेमातून काढून टाकले आहे, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. पण या सिनेमाचे दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. उलट त्यांनी रिया चक्रवर्तीच्या कामाचे कौतुकच केले आहे. सिनेमातील रोल अजिबात कमी केलेला नाहीये हे त्यांनी ठळकपणे मीडियाला सांगितले आहे.

एक दिग्दर्शक असण्याबरोबरच रुमी जाफरी एक लेखक म्हणूनही काम करतात. त्यांनी आजवर ५४ सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत. चेहरे हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार याविषयी कोणतीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाहीये. रुमी जाफरी यांच्या म्हणण्यानुसार सिनेमाचे प्रोड्यूसर सध्या अमेरिकेमध्ये आहेत. ते भारतामध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी फायनल डिसिजन घेण्यात येईल.