टी २० विश्वचषकानंतर होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला स्थगिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टी २० विश्वचषकानंतर होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला स्थगिती

टी २० विश्वचषकानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा होणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन टी २० सामन्यांची मालिका खेळणार होता. दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेली दोन कसोटी सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. मात्र न्यूझीलंड क्रिकेटने हा दौरा स्थगित केला आहे. Stuff.co.nz नुसार न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने दौरा रद्द केल्याची पुष्टी केली आहे. तथापि, आतापर्यंत दौरा पुढे ढकलण्याबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट न्यूझीलंडकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भारताच्या न्यूझीलंड दौरा २०२२ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. करोना संसर्गाबाबत न्यूझीलंडमध्ये क्वारंटाइनचे कडक नियम आहेत. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकानंतर हा दौरा निश्चित केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. विश्वचषकानंतर कीवी क्रिकेटर डिसेंबरच्या सुरुवातीला मायदेशी परतणार नाही. मायदेशी परतल्यानंतर संघाला आयसोलेशन आणि क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांचा आहे. दुसरीकडे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २८ डिसेंबर किंवा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश दोन कसोटी आणि ३ टी २० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेवरही करोनाचं सावट असणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर झाला असून हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची घोषणा केली.