आयपीएल’साठी मर्यादित प्रेक्षकांना परवानगी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयपीएल’साठी मर्यादित प्रेक्षकांना परवानगी

संयुक्त अरब अमिरातीमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्यात स्टेडियममध्ये मर्यादित प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे, अशी घोषणा संयोजकांनी केली आहे.

जैव-सुरक्षित परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे मे महिन्यात ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आले. येत्या रविवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या लढतीने ‘आयपीएल’ला प्रारंभ होणार आहे.

‘‘करोनाविषयक शिष्टाचार आणि अमिरातीमधील सरकारचे नियम या पार्श्वभूमीवर दुबई, शारजा आणि अबू धाबी येथील सामन्यांना मर्यादित प्रेक्षकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपासून ‘आयपीएल’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रेक्षकांना तिकीट उपलब्ध होऊ शकेल,’’ असे ‘आयपीएल’ संयोजकांनी म्हटले आहे. २०१९नंतर प्रथमच ‘आयपीएल’ सामने प्रेक्षकांच्या साक्षीने होणार आहेत. गतवर्षी ही लीग अमिरातीमध्ये बंदिस्त स्टेडियमवर खेळवण्यात आली. २०२१मध्ये जैव-सुरक्षित परिघात हंगामाला प्रारंभ झाला. पण खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे हंगाम स्थगित झाला.