घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद

करोना काळात गरीबांसाठी मसिहॉंबनलेला अभिनेता सोनू सूद लागोपाठ लोकांच्या मदतीला धावून येतोय. अभिनेता सोनू सूदला जितकं शक्य होतंय, तितकं तो त्याच्या परीने लोकांना मदत करताना दिसून येतोय. याशिवाय त्याच्या घरी मदतीसाठी जे जे येत आहेत त्यांच्या सेवेतही तो लागोपाठ धडपड करतोय. त्याच्या घरी येणाऱ्या माध्यमकर्मींना आणि इतर जणांना तो सरबत देताना दिसून आलाय.

अभिनेता सोनू सूदच्या बिल्डिंगखाली लोकांची गर्दी झाली होती आणि भर उन्हाच्या तडाख्यात सर्व लोक उभे असल्याचं सोनू सूदने पाहिलं. हे पाहून सोनू सूदला रहावलं नाही आणि तळपत्या उन्हात दिलासा देण्यासाठी तो बिल्डिंगखाली आला. बिल्डिंगखाली उभे असलेले अनेक मीडियाकर्मी आणि इतर मंडळींना त्याने स्वतःच्या हाताने सरबत दिलं. यावेळी त्याने लोकांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देखील दिले. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचे अनेक चाहते त्याने राजकारणात यावे अशी इच्छा व्यक्त करताना दिसून आले. त्यात राखी सावंतने ही सोनू सूदला प्रधानमंत्री करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर सोनू सूदला त्याच्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता त्याने उत्तर दिलं. यावेळी सोनू सूद म्हणाला, ” जो तो ज्याच्या त्याच्या जागेवरच बरा आहेमी सामान्य माणूसच बरा आहेनिदान तुमच्यासोबत उभा तरी राहू शकतो…”.

नुकताच राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आलाय. यात राखीने अभिनेता सलमान खान, सोनू सूद आणि अमिताभ बच्चन यांचं कौतूक करताना दिसून आली. सोबतच ती या तिघांना खरे हिरो असं देखील म्हणाली. या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली, ” मी तर म्हणेल, सोनू सूदला देशाचा पंतप्रधान करासलमान खानला बघा, तो सुद्धा किती मदत करतोयत्याला पंतप्रधान बनवामंत्री तर सध्या डिबेट करत आहेतआम्हाला तुमचे डिबेट नकोतआम्हाला व्हॅक्सिन हवीआम्हाला बेड्स हवेतआम्हाला ऑक्सिजन हवा…”, असं या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली.