“गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीसुमनं उधळली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली”, असं ते म्हणाले. सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्र्यालय नारायण यांच्याकडे आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तर गोमूत्र शिंपडण्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“वीज पुरवठा नाही राज्यात म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार, इथल्या मंत्र्यांशीही बोलणा

र. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार आज बेरोजगार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना माहिती नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा.” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

शुद्धिकरणाचं काय कारण देण्यात आलं?

शिवसेना सोडल्यानंतर व बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नारायण राणे यांना कधी स्मृतीस्थळाची आठवण आली नव्हती. आता राजकारणासाठी त्यांना बाळासाहेबांची आठवण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत असतानाही बाळासाहेबांच्या या पुत्रावर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्या नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले. त्यामुळे दुग्धाभिषेक करून, फुले वाहून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण के ल्याचे अप्पा पाटील व इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी पत्रकारांना सांगितले.