'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते

मुंबई, १६ मे, (हिं.स.) : कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडला.

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार