नौदलाची शोधमोहीम अखेर १५० तासांनंतर थांबवली

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नौदलाची शोधमोहीम अखेर १५० तासांनंतर थांबवली

मुंबई : समुद्रात बुडालेल्या बार्जच्या कर्मचाऱ्यांची शोधमोहीम आता तब्बल १५० तासांनंतर थांबवण्यात आली आहे

शोधमोहीम करणाऱ्या सर्व नौका माघारी परतल्या आहेत. तटरक्षक दलाच्या काही नौका अद्यापही तेथे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या ही लवकरच परतणार आहेत. शोध मोहिमेसाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, दोन गस्ती नौका एक कॅटामरान श्रेणीतील नौका कार्यरत होत्या. 'मुंबई हाय'जवळच्या ओएनजीसीच्या इंधन विहिरीजवळ बार्ज -३०५ बुडाले होते. त्यात २६१ होते. त्यातील १८६ जणांना वाचवण्यात  यश मिळाले आहे. तर ७० कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले आहेत