गडचिरोली : सी-60 आणि नक्षल चकमकीत 13 नक्षल्यांना कंठस्नान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गडचिरोली : सी-60 आणि नक्षल चकमकीत 13 नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात तालुक्यात आज सकाळी सी-60जवान आणि
नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60 जवानांना यश प्राप्त झाले
आहे.घटनास्थळी शोधमोहीमेनंतरच ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा नेमका आकडा कळू शकणार आहे.त्यामूळे
गडचिरोली च्या इतिहासात दुसरी मोठी चकमक आहे.
सी-60 जवानांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगल परीसरात तेंदूपत्ता
हंगामासंदर्भात नक्षलवाद्यांनी बैठक आयोजित केली असल्याची माहीती मिळाली होती.त्यानुसार जवानांनी
शोधमोहीमे दरम्यान कसनसुर पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या पैडीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या
नक्षल्यानी पोलिस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला पोलिस जवानाणी नक्षल्याना प्रतिउत्तर देत यात
13नक्षल्याना ठार करण्यात यश प्राप्त झाले आहे या चकमकीत कसनसुर दलम चें सर्व नक्षल असुन पूर्ण दलम
नष्ट करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे पोलिसांनी जंगल परिसरात सर्चिग आपरेशन अधिक तीव्र
केले असुन मृत नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.