मुंबईकरांना दिलासा; आठवड्याभरात तलावांमध्ये १७२ दिवसांचा जलसाठा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईकरांना दिलासा; आठवड्याभरात तलावांमध्ये १७२ दिवसांचा जलसाठा

मुंबई : मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सात दिवसांतच सुमारे १७२ दिवसांचा जलसाठा प्रमुख तलावांमध्ये जमा झाला आहे. सध्या ६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता २४२ दिवसांचा जलसाठा तलावांमध्ये असल्याने मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १७ जुलैपर्यंत फक्त १८ टक्केच जलसाठा शिल्लक होता. मात्र, मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात तलावांमध्ये तब्बल १० ते १२ दिवसांचा जलसाठा वाढला. त्यांनतर आठवडाभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जलसाठा वाढला. यामुळे मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी हे चार प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर, मध्य वैतरणा आणि भातसा या प्रमुख तलावांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे.



२४ जुलै रोजी जल साठ्याची आकडेवारी
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ १४३७६९ १२८.५६
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३३



तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२३
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ७८३६४ ५९८.५७
भातसा १४२.०७ १०४.९० ४१४९८३ १२९.८०
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १०६९७८ २६९.२८