लसीकरणाचा वेग वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लसीकरणाचा वेग वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली :  प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कोविड-19 ची लसीकरण मोहिमेला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सर्व हितसंबंधीयासोबत सक्रीयपणे मार्गदर्शनआढावा आणि देखरेख ठेवण्याच्या कटिबद्धतेचा भाग म्हणूनकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  डिजिटल संवाद प्रणालीच्या माध्यमातूनलसीकरणाचा आढावा घेतला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासकांसोबत झालेल्या या बैठकीतकोविन सॉफ्टवेअर मध्ये सुधारणाआणि लसीकरणात अधिक लवचिकता आणण्यासह प्रभावी अंमलबजावणी आणि कोविड प्रतिबंधन आणि व्यवस्थापनाविषयी चर्चा झाली. लसींचा जेवढा साठा उपलब्ध आहेतसेच जूनच्या अखेरपर्यंत जो साठा उपलब्ध होणार आहेत्याचा अंदाज घेऊन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्याचे नियोजन करुन लसीकरण मोहीम व्यापक करावीअसा सल्ला यावेळी आरोग्य मंत्रालयाने दिला. लसींची पुढची खेप, 15 जून 21 पर्यंत येण्याची अपेक्षा असून ही लस केंद्राकडून मोफत दिली जात आहे. त्यानंतर 30 जूनपर्यंत राज्यांना विकत घेता येणारी लस  या दोन्हीच्या अपेक्षित पुरवठ्याची यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आली आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 2-3 सदस्यांचा एक समर्पित चमू तयार करावाजेणेकरून हा चमूलस उत्पादकांच्या सातत्याने संपर्कात राहील आणि केंद्र सरकारव्यतिरिक्त (यात खाजगी दवाखान्यांचाही समावेश) इतर माध्यमातूनही लसीचा पुरेसा पुरवठा योग्य वेळेत होईलयाकडे लक्ष ठेवावेअसाही सल्ला देण्यात आला. (खाजगी रुग्णालयांना मिळणारी लस आणि लसीकरणाची आकडेवारी रोज राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना दिली जाते.)

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसीकरण केंद्रांची जिल्हानिहाय यादी तसेचकोविड-19 लसीकरण केंद्रांमधील,15 जून 2021 पर्यंतचा सविस्तर कार्यक्रम तयार करावा तसेच हे नियोजन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्व माध्यमांचा वापर करावाअसेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेचविकेंद्रित संपर्क धोरण तयार करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावीअसाही सल्ला देण्यात आला. तसेच ग्रामीणआदिवासी भागातदुर्गम भागात लसीबाबत असलेली भीती वा उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न करावाअसेही त्यांनी सांगितले. जे आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोनायोध्यांमध्ये कोणी स्तनदा माता असल्यास आणि त्यांना अद्याप लस मिळाली नसेल त्यांना प्राधान्याने लस दिली जावीअसेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.