घटना दुरूस्तीने मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटू शकतो - श्रीमंत शाहू छत्रपती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

घटना दुरूस्तीने मराठा आरक्षणाचा विषय लवकर सुटू शकतो - श्रीमंत शाहू छत्रपती

कोल्हापूर  : राज्यातील ४८ खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधानांकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो, असे मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात ते बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले कीमुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी खासदारांना आग्रह धरावा लागणार आहे. केंद्राकडे मागणी करावी लागणार आहे. संसदेत दोन तृतीयांश खासदार आपल्या बाजूने वळवावे लागतील.

 

चर्चेतूनच तोडगा निघू शकतो - सतेज पाटील

 

महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझं जाहीर निमंत्रण आहे की, उद्या संभाजीराजेंनी मुंबईत यावं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकारमध्ये चर्चा व्हावी, असे म्हणत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आंदोलनातच संभाजीराजेंना सरकारला भेटण्याचे निमंत्रण दिले.