‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने सांगितले फिटनेसचे रहस्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने सांगितले फिटनेसचे रहस्य

स्टार प्रवाहवरीलआई कुठे काय करतेया मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण टीम एकत्र एका छताखाली आहे. मालिकेच्या निमित्ताने एक छान कुटुंब तयार झालं आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच सकाळच्या नाश्ता, जेवणापासून ते अगदी व्यायामापर्यंत सर्व काही ठरवून एकजुटीने केलं जातंय.

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. 'सेटवर मी अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी आम्ही तिघी चुकता व्यायाम करतो. योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे. शूटिंग संपलं की आम्ही सर्व एकत्र डिनर करतो. त्यानंतर वॉक हा ठरलेला. शूटिंगमधूनही वेळ काढत हॉटेलच्या रुममध्ये आम्ही ठरवून व्यायाम करतो,' असे रुपाली म्हणाली.