सेन्सेक्स सहा महिन्यांत 50 वरून 55 हजार, 45 वरून 50 हजार 2 महिन्यांत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सेन्सेक्स सहा महिन्यांत 50 वरून 55 हजार, 45 वरून 50 हजार 2 महिन्यांत

मुंबई : देशातील शेअर बाजारांत सुरू तेजीमुळे सेन्सेक्सने नवा विक्रम स्थापन केला आहे. आशियातील हा सर्वात जुना निर्देशांक शुक्रवारी प्रथमच ५५,००० पार पोहोचला आहे. मात्र, याला ५० वरून ५५ हजारांवर पोहोचण्यास सहा महिने लागले. ४५ वरून ५० हजारांचा टप्पा केवळ दोन महिन्यांत प्राप्त केला होता. गेल्या वर्षी ४ डिसेंबरला सेन्सेक्स प्रथमच ४५ हजारांवर पोहोचला होता. या वर्षी ३ फेब्रुवारी रोजी ५० हजार पार गेला होता. आता शुक्रवारी हा ५९३.३१ अंकांची(१.०८%) उसळी घेत पहिल्यांदा सेन्सेक्स ५५,००० पार होऊन ५५,४३७.२९ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवसायादरम्यान याने ५५,४८७.७९ चा नवा सर्वकालीन उच्चांक स्थापन केला. हा पहिल्यांदाच १६,५०० ची पातळी पार होऊन १६,५२९.१० च्या विक्रमी उंचीवर बंद झाला. कंपन्यांचे तिमाही निकाल उपेक्षेपेक्षा चांगले राहिले आहेत. आर्थिक आकडेही सकारात्मक राहिले आहेत. जुलैमध्ये रिटेल महागाई दर दोन महिन्यांनंतर घटून ६% पेक्षा खाली नोंदला. अमेरिकेत पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची तयारी सुरू आहे. सर्व धातू, अभियांत्रिकी कंपन्या निर्यात करतात, त्यामुळे या सर्व शेअर्समध्ये तेजी राहिली.

बाजारात चढ-उतार वाढू शकतो
आगामी काळात बाजारात चढ-उतार वाढू शकतो. लहान गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगावी. बाजार ज्या उंचीवर आहे, ते पाहता आता शॉर्ट टर्म ट्रेडिंगची वेळ नाही. लहान गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लाँग टर्मच्या हिशेबाने पैसा गुंतवला पाहिजे. - प्रकाश दिवाण, संचालक, अल्टामाउंट कॅपिटल