कमाल तापमानात घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कमाल तापमानात घट

मुंबई : शनिवारी सकाळपासून मुंबईत विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्याने दिवसभर वातावरण ढगाळ होते. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत अंशांनी घट दिसून आली.

सांताक्रूझ येथे २८. अंश सेल्सिअस आणि कु लाबा येथे २८. अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे २०. मिमी, तर सांताक्रूझ येथे २८. मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर वाढणार

पुणे : अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह इतर काही ठिकाणी रविवारपासून (११ जुलै) चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.